१.  बिनतारी संदेश यंत्रणा

बिनतारी यंत्रचालक व बिनतारी संदेशवाहक यांच्या संवर्ग निर्मिती बाबतचा प्रस्ताव या कार्यालयाचे पत्र क्र.लाक्षेवि/पावि/तां.१/बिनतारी आस्थापना/९९५४, दि १०-१२-२००१ द्वारे शासनास सादर करण्यात आला आहे. यावर शासनस्तरावर कार्यवाही व्हावी.


२.० प्रकल्पवार कामाची माहिती व ठळक वैशिष्ठ्ये
२.१ प्रास्ताविक :
मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, औरंगाबाद यांच्या कार्यक्षेत्रात मराठवाडा विभागातील मोठा प्रकल्पाचे बांधकाम या प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनाचे काम, सदर मोठा प्रकल्पावरील भू-विकासाची भाग-१ व भाग-२ ची कामे, जलनि:स्सारण आदी लाभक्षेत्र विकास कामाचा समावेश आहे.
बांधकामाधीन प्रकल्प खालील प्रमाणे आहेत.
१. उर्ध्व पेनगंगा प्रकल्प
२. माजलगाव प्रकल्प
३. निम्न दुधना प्रकल्प
उपरोक्त प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे व निर्मित सिंचन क्षमते वरील क्षेत्रात भूविकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
या विभागांतर्गत खालील मोठे प्रकल्प सिंचन व्यवस्थापनासाठी व लाभक्षेत्र विकास कामासाठी आहेत.
१. जायकवाडी प्रकल्प
२. माजलगाव प्रकल्प
३. मांजरा प्रकल्प
४. निम्न तेरणा प्रकल्प

तसेच मध्यम प्रकल्प व लघू प्रकल्पाचे व्यवस्थापन या प्रादेशिक कार्यालयाकडे आहे.(परिशिष्ट १)
उपरोक्त कामासाठी खालील दोन प्राधिकरण व दोन मंडळ कार्यालये कार्यरत आहेत.
(अ) लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद
(ब) लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड
(क) जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद
(ड) उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड

२.२ प्रकल्पवार ठळक वैशिष्ठ्ये सोबतच्या तक्त्यात जोडली आहेत. (परिशिष्ट १ व २)

३.० बिनतारी संदेश यंत्रणा
३.१ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद हे दि. ०१-१०-९८ ला स्थापन झाले. बिनतारी संदेश यंत्रणा देखभाल व दुरूस्तीवर दि.०१-१०-९८ पासून ते ३१-१२-९९ व ३१-०३-२००० पर्यंतचे खोरे निहाय खर्च खालील प्रमाणे असून संबंधीत महामंडळाकडून खर्च वसूली बाबत पाठपुरावा चालू आहे.

खोऱ्याचे नांव

दुरूस्ती कामे

लायसन्स व रॉयल्टी  

  एकूण

 

१-१०-९८ ते३१-३-९९

१-४-९९ ते३१-१२-९९

१-१०-९८ ते३१-३-९९

१-४-९९ ते३१-०३-२०००

एकूण(रुपये)

कोंकण

१,४९.४१०

२,६३,१००

८३,५९०

१,६७,१८०

६,६३,२८०

वर्धा

१,५१,२६०

२,५६,५००

९५,९९१

१,९१,९८२

६,९५,७३३

वैनगंगा

३,८३,१७०

६,०९,०००

१,७३,२१०

३,४६,४२०

१५,११,८००

पेनगंगा

१,४५,८७०

२,२६,२००

१८,६१०

३७,२०९

४,२७,८८९

एकूण

 

 

 

 

४०,९४,१८६

 


३.१.१. कोंकण प्रदेशातील थकबाकी रक्कम रुपये ६,६३,२८०/- पैकी कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे कडे रुपये ३५,४७० रक्कम थकबाकी आहे व मुख्य अभियंता (पा.वि.) कोंकण प्रदेश,मुंबई यांचे कडे रु ६,२७,८१० रक्कम थकबाकी आहे.
३.१.२ विदर्भातील (वैनगंगा/वर्धा/पेनगंगा खोऱ्यांची रक्कम) रुपये २६,३५,४२२/- मुख्य अभियंता (पा.वि.) नागपूर यांच्याकडे थकबाकी आहे.
३.२ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद यांनी त्यांचे पत्र क्र. गेामपाविमं/ तां-४ /पुपुयो/२८९१ दिनांक ०१-०१-२००० अन्वये ०१-०१-२००० पासून यापुढे फक्त गोदावरी खोऱ्यातील बिनतारी संदेश यंत्रणेच्या देखभाल व दूरुस्तीची कामे प्रशासक औरंगाबादने करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
गोदावरी खोरे अतर्गत उभारण्यात आलेल्या बिनतारी संदेश केंद्रासाठी पुढील प्रमाणे संच कार्यान्वीत आहे.

अ.क्र          

संचप्रकार        

संख्या

        

स्थिरसंच           

५६७

        

चलसंच        

८४

        

हस्तसंच  

१५६

        

पुन:प्रक्षेपणसंच

१६

        

आर.टि.एक्सचेंज

        

पुर पुर्वानुमान योजनेसाठी जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत -अ) एच.एफ. संचब) व्ही.एच.एफ. संच

१०४५